
पर्यटन हा आपल्या सर्वांचा आवडता छंद. आपण वर्षातून किमान दोन वेळा तरी कुठे ना कुठे फिरायला जातोच. वाढत्या शहरीकरणामुळे ग्रामीण कृषी संस्कृतीशी आपला संबंध हळूहळू कमी होत चालला आहे. हीच मातीशी असलेली नाळ अतूट ठेवण्यासाठी वर्षातून किमान एकदा तरी कृषी पर्यटन आवर्जून केले पाहिजे. सध्या अनेक ठिकाणी कृषी पर्यटन केंद्रे सुरु झालेली आहेत, पण एखाद्या कृषी पर्यटन केंद्राला भेट देण्याआधी काही गोष्टी तपासल्या पाहिजेत जेणेकरून आपले पर्यटन आनंददायी आणि समाधानकारक होईल.
कल्पना करा की, तुमचे लग्न पारंपारिक मराठी पद्धतीने होत आहे. लग्नाला आलेले सगळे जण पारंपारिक मराठी, शाही कपडे परिधान करून आलेले आहेत, प्रत्येकाच्या डोक्यावर फेटा किंवा पगडी आहे. सर्व महिला नउवारी साडीत आहेत, त्यांनी पारंपारिक पद्धतीने दागिने आणि केशरचना केलेली आहे. सर्वांच्या पायात मोजडी किंवा कोल्हापुरी चपला आहेत.
माणूस हा उत्सवप्रिय प्राणी आहे. आपल्या सर्वांनाच सण-समारंभ अत्यंत उत्साहात साजरे करायला आवडतात. किंबहुना आपण प्रत्येक संभारंभात काहीतरी वेगळं करून आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करत असतो. लग्न असो, वाढदिवस असो, पार्टी असो, गेट टुगेदर असो किंवा असे कोणतेही कार्यक्रम किंवा समारंभ असो आपल्याला ते नेहमीच अविस्मरणीय बनवायचे असतात. त्यासाठी आपण बरीच सजावट आणि रोषणाई करतो. थोडक्यात काय तर आपले समारंभ अविस्मरणीय व्हावेत असेच आपल्याला वाटत असते.
पर्यटन हा आपल्या सर्वांचाच आवडीचा विषय. वेगवेगळ्या ठिकाणी भेटी द्यायला, वेगवेगळे अनुभव घ्यायला सर्वांनाच आवडतं. भारतासारख्या कृषिप्रधान देशात गेल्या काही वर्षांपासून कृषी पर्यटन हा पर्यटनाचा उत्तम पर्याय म्हणून विकसित होत आहे. कृषी पर्यटन केंद्राला भेट दिल्यानंतर काय काय करायला हवे असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
मिरज पासून अवघ्या ४ किलोमीटर अंतरावर, शांताई गार्डनला अगदी लागून असणाऱ्या या रम्य परिसरात आपण यावं, आम्ही आपलं आपुलकीने स्वागत करावं, आणि विकेंड नंतर तुमचं मन नव्याने प्रफुल्लित व्हावं असं आम्हाला मनापासून वाटतं.
पर्यटन हा बहुतांश लोकांचा आवडता छंद. वेगवेगळ्या ठिकाणी भेटी द्यायला, फिरायला, निसर्गाच्या तसेच ऐतिहासिक स्थळांच्या सानिध्यात रमायला सगळ्यांनाच आवडते. भारतात दरवर्षी कोट्यवधी लोक विविध ठिकाणी पर्यटन करतात. म्हणून तर देशाच्या GDP मध्ये जवळपास १०% वाटा हा पर्यटनाचा आहे. गेल्या काही वर्षांपासून पर्यटन व्यवसाय वाढत आहे.
आपल्याला सिमेंटच्या जंगलात बिना चप्पल चालायची सवय नसते, शेतात मात्र ढेकळं तुडवीत चालण्यात अमाप सुख असतं, मोकळ्या आकाशाखाली शेकोटी करून हुरडा पार्टी करण्यातली मौज तर निराळीच, पक्षांचा किलबिलाट, कोंबड्याची बांग आणि अंगावर येणारी सूर्याची कोवळी किरणे अनुभवत झोपेतून उठण्याचं सुख काही औरच असतं..
