Reasons to Visit Agro Tourism, कृषी पर्यटन का करावे?

पर्यटन हा बहुतांश लोकांचा आवडता छंद. वेगवेगळ्या ठिकाणी भेटी द्यायला, फिरायला, निसर्गाच्या तसेच ऐतिहासिक स्थळांच्या सानिध्यात रमायला सगळ्यांनाच आवडते. भारतात दरवर्षी कोट्यवधी लोक विविध ठिकाणी पर्यटन करतात. म्हणून तर देशाच्या GDP मध्ये जवळपास १०% वाटा हा पर्यटनाचा आहे. गेल्या काही वर्षांपासून पर्यटन व्यवसाय वाढत आहे. याच्याच आधारावर कृषिप्रधान असलेल्या आपल्या देशात कृषी पर्यटन ही संकल्पना जोर धरू लागली आहे. शेती हा भारतातील सर्वात मोठा व्यवसाय. त्यालाच थोडी पर्यटनाची जोड देऊन कृषी पर्यटन ही संकल्पना उदयास आली. अनेकांना प्रश्न पडत असेल की कृषी पर्यटन का करावे?

Agro Tourism near me

तुम्ही कृषी पर्यटन का करायला हवे याची ३ कारणे :

१. धकाधकीच्या जीवनामुळे आलेली मरगळ झटकून मनावर हिरवळ बहरण्यासाठी –

आजकाल आपण सगळेच प्रचंड धकाधकीचे आयुष्य जगत आहोत. उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या स्थलांतरित झालेली आहे. सोबतच प्रदूषण, कामाचा ताण, आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अनेक शहरांमध्ये तर मोकळा श्वास घेणं देखील सुसह्य राहिलेले नाही. अशा धकाधकीच्या आयुष्यातून जीवाला थोडासा मोकळेपणा आणि त्या मोकळेपणात मातीशी नाळ जोडणारा आपलेपणा अनुभवण्यासाठी कृषी पर्यटन करायला हवे. धावपळीमुळे आलेली मरगळ झटकून आयुष्य जगण्याची नवी ऊर्जा मिळवण्यासाठी, मनावर आनंदाची आणि समाधानाची हिरवळ चढवण्यासाठी कृषी पर्यटन करायला हवे.

२. शहरात जन्मलेल्या-वाढलेल्या नव्या पिढीला शेती आणि ग्रामीण जीवनाची ओळख करून देण्यासाठी –

पूर्वीचे लोक जेवण झाले की ‘अन्नदाता सुखी भव’ असं म्हणायचे, कारण त्यांना जाण होती की आपल्या ताटात येणारं अन्न पिकवायला अन्नदात्याला किती कष्ट पडतात. बदलत्या काळानुसार आणि वाढत्या शहरीकरणामुळे आपली मातीशी असलेली नाळ तुटत चालली आहे. आताच्या पिढीला ‘दूध कोण देत?’ विचारलं तर ते ‘दूधवाला भैय्या’ असं उत्तर देतात. ग्रामीण आणि शहरी जीवनात वाढत चाललेली ही दरी भरून काढण्यासाठी आपण कृषी पर्यटन केलं पाहिजे. कृषी पर्यटनामुळे आताच्या पिढीला शेती जवळून पाहता येईल. आपल्या घरात येणारे अन्नधान्य कसे तयार होते हे समजून घेता येईल. शेतातून ढेकळं तुडवत चालण्याचा, गोफण फिरवण्याचा, बैलगाडीतून फेरफटकायचा मारण्याचा आनंद नव्या पिढीला मिळावा म्हणून कृषी पर्यटन नक्की करायला हवे.

३. ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी आणि ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करण्यासाठी –

बसल्या बसल्या विकासाच्या मोठ्या मोठ्या बाता बरेच जण मारतात. स्वातंत्र्यानंतर देशाचा बराच विकास झाला, पण खेडी बऱ्याच अंशी दुर्लक्षित राहिली. ग्रामीण भागातले अनेक लोक रोजगारासाठी शहरात येतात, त्यामुळे शहरांवरचा ताण देखील वाढतो. मात्र कृषी पर्यटनामुळे ग्रामीण भागात सुद्धा रोजगार वाढायला मदत होते. आपण कृषी पर्यटन केले तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी येईल, ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होईल. खेडी पण हळूहळू विकसित होतील. त्यामुळे कृषी पर्यटन आपण सगळ्यांनी करायलाच हवे.

तुम्ही कधी कृषी पर्यटन करताय? मधुबन कृषी पर्यटन केंद्र, मिरज येथे आवर्जून भेट द्या आणि मन प्रफुल्लित करून घरी या. बुकिंग साठी येथे क्लिक करा. मधुबन कृषी पर्यटन केंद्राबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा आणि वेबसाईटला भेट द्या.

Website : https://madhubankrushiparyatan.in/ 

#Agro_Tourism #Agri_Tourism #Agro_Tourism_Near_Me #One_Day_Picnic_Spot