कृषी पर्यटनासाठी ठिकाण निवडताना या गोष्टींकडे लक्ष द्या

agro tourism

पर्यटन हा आपल्या सर्वांचा आवडता छंद. आपण वर्षातून किमान दोन वेळा तरी कुठे ना कुठे फिरायला जातोच. वाढत्या शहरीकरणामुळे ग्रामीण कृषी संस्कृतीशी आपला संबंध हळूहळू कमी होत चालला आहे. हीच मातीशी असलेली नाळ अतूट ठेवण्यासाठी वर्षातून किमान एकदा तरी कृषी पर्यटन आवर्जून केले पाहिजे. सध्या अनेक ठिकाणी कृषी पर्यटन केंद्रे (Agro Tourism) सुरु झालेली आहेत, पण एखाद्या कृषी पर्यटन केंद्राला भेट देण्याआधी काही गोष्टी तपासल्या पाहिजेत जेणेकरून आपले पर्यटन आनंददायी आणि समाधानकारक होईल. (Find Best Agro Tourism)

कृषी पर्यटनासाठी ठिकाण निवडताना खालील गोष्टींकडे जरूर लक्ष द्यावे :

agro tourism

१. संबंधित कृषी पर्यटन केंद्रावर काय काय सोयी सुविधा आहेत? (Facilities offered at Agro Tourism)
२. कृषी पर्यटन केंद्रावरचे लोक तुम्हाला शेती संबंधी माहिती देतील का? गप्पा गोष्टी करतील का? तुम्हाला शेतातून फिरायला मोकळीक मिळेल का?
३. बैलगाडी किंवा घोडागाडी यांतून फेरफटका मारण्याची सोय आहे का?
४. कृषी पर्यटन केंद्रापासून जवळ अजून काही फिरण्यासारखे आहे का?
५. तुमची गाडी पार्क करण्यासाठी सोय आहे का? (Parking at Agro Tourism)
६. राहण्याची आणि खाण्याची उत्तम सोय आहे का? (Accommodation offered at Agro Tourism) 

agro tourism

७. तुम्ही शाकाहारी असाल तर शाकाहारी जेवणाची व्यवस्था आहे का?
८. राहण्यासाठी स्वतंत्र खोल्या आहेत का? त्यांची साफसफाई वेळच्या वेळी होते का? (Cleanliness and Well Maintained Rooms at Agro Tourism)
९. स्वच्छतागृहाची सोय आहे का? स्वच्छतागृह स्वच्छ आणि पाण्याची चांगली सोय असलेले आहे का? (Clean Washrooms)
१०. तिथून खरेदी करण्यासारखे काही आहे का? उदा.फळे, फुले, भाजीपाला इत्यादी.
११. आपल्या मुलांना खेळण्यासाठी, मजा मस्ती करण्यासाठी मोकळी जागा आणि खेळण्याची साधने उपलब्ध आहेत का?

agro tourism

अशा छोट्या छोट्या गोष्टींची चौकशी करा, कृषी पर्यटन केंद्राची वेबसाईट असेल तर तिला भेट द्या, त्यावरून तुम्हाला वरील प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली तर समजून जा की ते कृषी पर्यटन केंद्र तुमच्यासाठी उत्तम आहे. तुम्ही तिथे आरामात सुट्टीची मजा घेऊ शकता.

अशाच गोष्टींचा विचार करून आम्ही मधुबन कृषी पर्यटन केंद्र उभारले आहे. आतापर्यंत हजारो लोक इथे येऊन सुट्टीचा आनंद लुटून गेले आहेत. तुम्ही सुद्धा इथे तुमची सुट्टी आनंदात घालवण्यासाठी आपल्या कुटुंबासोबत नक्की येऊ शकता.

मधुबन कृषी पर्यटन केंद्र, मिरज (Agro Tourism) बद्दल जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ नक्की बघा.

मधुबन कृषी पर्यटन केंद्र, मिरज, (Agro Tourism) तुम्हाला असेच छान छान आणि अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी तुमची वाट पाहत आहे. बुकिंग साठी येथे क्लिक करा.

#Madhuban_Agro_Tourism #Madhuban_Resort #Agro_Tourism_Near_Me #Agro_Tourism