लॉकडाऊन नंतर मूड रिफ्रेश करण्यासाठी तुम्ही येथे एक दिवसाची सहल आयोजित करू शकता

कोरोनाचा वाढत चाललेला प्रादुर्भाव आणि नाईलाजाने लागलेला लॉकडाऊन (Covid 19 Pandemic) यामुळे आपल्याला घरात बसावं लागत आहे. ठराविक वेळेनंतर घरात बसून बसून, तेच तेच काम करून सगळं कंटाळवाणं वाटायला लागतं याचा अनुभव आपण गेले वर्षभर घेत आहोत. एक वेळ अशी येते की चार भिंतींच्या आत आपल्याला कोंडल्यासारखं वाटू लागतं. मग आपल्याला वाटू लागतं की कुठेतरी बाहेर फिरायला गेलं पाहिजे, निसर्गाच्या सानिध्यात दिवस घालवला पाहिजे (One Day Picnic), मनावर आलेली मरगळ झटकून टाकली पाहिजे आणि आयुष्याचा आनंद घेतला पाहिजे.

Agro Tourism near me

आपण लॉकडाऊन संपल्यानंतर कुठे फिरायला जायचं याची स्वप्ने बघायला सुरु करतो तोच पुन्हा लक्षात येत की कोरोनाचा धोका अजून संपलेलाच नाही. मग अशावेळी काय करायचं? एक दिवसाची सहल आपल्या जवळच्या ठिकाणी आपण नक्की करू शकतो (Agro Tourism near me). जेणेकरून आपण आवश्यक ती काळजी घेऊन एक दिवस मोकळा श्वास घेऊ शकतो. मग असा मोकळा श्वास घ्यायला मधुबन कृषी पर्यटन केंद्र, मिरज अर्थात मधुबन रिसॉर्ट हा एक उत्तम पर्याय आहे. इथे तुम्ही एक दिवसाची सहल करू शकता आणि आयुष्याचा मनमुराद आनंद घेऊ शकता, तो ही अगदी निर्धास्तपणे कारण तुमची काळजी घ्यायला आम्ही आहोत.

मिरज पासून अवघ्या ४ किलोमीटर अंतरावर, शांताई गार्डनला अगदी लागून असणाऱ्या या रम्य परिसरात आपण यावं, आम्ही आपलं आपुलकीने स्वागत करावं, आणि विकेंड नंतर तुमचं मन नव्याने प्रफुल्लित व्हावं असं आम्हाला मनापासून वाटतं. मधुबनच्या परिसरात आनंदाची लयलूट करताना तुम्हाला कोणतीही कमतरता भासणार नाही याची पुरेपूर काळजी आम्ही इथं घेतलीये. निरव शांततेत अलगद उलगडणारी सकाळ तुमच्या आतल्या आवाजाला साद घालणारी.

इथे असणारी हिरवळ, शेततळं, पॉलीहाऊस सारखी शेती, अशा अनेक गोष्टी तुमच्या मनात हिरवा रंग भरू पाहणाऱ्या. इथं असणारा प्ले एरिया, टेनिस कोर्ट अशा विविध खेळांचा माहोल अबाल-वृद्धांना मनसोक्त बागडायला प्रवृत्त करणारा. इतकंच नाही तर स्विमिंग गेम्स, रेन डान्स अशा कित्येक गोष्टी तुम्हाला चिंब भिजण्याचा आनंद देणाऱ्या, तुमचा मूड रिफ्रेश करणाऱ्या. भरपूर गप्पा मारत पोटभर जेवण करताना तुमच्या जिभेवर तासन तास रेंगाळणारी येथील पदार्थांची चव. तुम्हाला थोडी भटकंती करावीशी वाटली तर दंडोबा, भवानी डोंगर, खिद्रापूर येथे केलेली छोटेखानी सहलीची व्यवस्था.

तुमच्या आपल्या माणसांसोबत गोड गुजगोष्टी करत रमणारे तुम्ही आणि खळाळत्या गप्पांनी जमून आलेली मैफिल अजून रंगतदार आणि सुरेल व्हावी याची पुरेपूर काळजी घेणारे आम्ही. असा एकंदरीत सगळ्या बाजूंनी घट्ट जुळून आलेला हक्काचा विसावा म्हणजे मधुबन कृषी पर्यटन केंद्र, मिरज. आपण इथं यावं आणि आपला विकेंड साजरा करावा.

Agro Tourism near me

तर मंडळी, लॉकडाऊन संपला की नक्की भेट द्या. कोरोनाचे संकट अजून संपलेले नाही त्यामुळे आधी ऑनलाईन बुकिंग करा आणि मग भेट द्यायला या, जेणेकरून गर्दी टाळता येईल आणि आम्हाला आपली व्यवस्थित काळजी घेता येईल. ऑनलाईन बुकिंग साठी येथे क्लिक करा.
मधुबन कृषी पर्यटन केंद्र, मिरज आपली वाट पाहत आहे.
#Madhuban_Agro_Tourism #Agro_Tourism #One_Day_Picnic_Spot