Destination Wedding at Agro Tourism

agro tourism

लग्नाचा दिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खूपच उत्साहाचा आणि आनंदाचा दिवस असतो. हा दिवस अविस्मरणीय करण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही शक्कल लढवत असतो. लग्नकार्य धुमधडाक्यात पार पडायला सुद्धा अनेकांना आवडते. आपल्याकडे डेस्टिनेशन वेडिंग ही संकल्पना सुद्धा रुजू लागलीये. अनेक जण तर डेस्टिनेशन वेडिंग व्हावे यासाठी बराच पैसा खर्च करायला सुद्धा तयार असतात. डेस्टिनेशन वेडींगच्या वाढत्या लोकप्रियतेला लक्षात घेता मधुबन कृषी पर्यटन केंद्र, मिरज आपल्यासाठी डेस्टिनेशन वेडिंगची सुविधा उपलब्ध करून देत आहे.

कल्पना करा की, तुमचे लग्न पारंपारिक मराठी पद्धतीने होत आहे. लग्नाला आलेले सगळे जण पारंपारिक मराठी, शाही कपडे परिधान करून आलेले आहेत, प्रत्येकाच्या डोक्यावर फेटा किंवा पगडी आहे. सर्व महिला नउवारी साडीत आहेत, त्यांनी पारंपारिक पद्धतीने दागिने आणि केशरचना केलेली आहे. सर्वांच्या पायात मोजडी किंवा कोल्हापुरी चपला आहेत. लग्नाच्या ठिकाणी सुद्धा सर्व अगदी मराठी संस्कृतीला शोभेल असा देखावा उभारला आहे. नवरा-नवरी पालखीतून किंवा बैलगाडीतून येत आहेत. लग्नाचे जेवण सुद्धा पारंपारिक मराठी पद्धतीचे. विद्युत रोषणाई, सजावट आणि अगदी संगीत सुद्धा मराठी अस्मितेला शोभेल असेच. किती सुंदर लग्नसोहळा होईल हा. अविस्मरणीय..!

अशाप्रकारे डेस्टिनेशन वेडिंग तुम्ही मधुबन कृषी पर्यटन केंद्रावर करू शकता. लग्नासाठी लागणारा हॉल मधुबनकडे आहे (शांताई गार्डन). तुम्हाला फक्त तुमच्या लग्नाची थीम सांगायची आहे. तुमच्या थीम नुसार मधुबन कृषी पर्यटन केंद्रावर तुमच्या लग्न सोहळ्याचे उत्तम नियोजन करून दिले जाईल. तुम्हाला हवे असणारे आणि हवेहवेसे वाटणारे सर्व उपलब्ध करून दिले जाईल, ज्याने तुमच्या लग्नाची शोभा वाढेल आणि तुमचा लग्नसोहळा अत्यंत चांगल्याप्रकारे साजरा होईल.

डेस्टिनेशन वेडिंग म्हणलं की आपल्या डोळ्यांसमोर आधी मोठमोठे खर्चाचे आकडे दिसू लागतात. मात्र काळजी करू नका. मधुबन कृषी पर्यटन केंद्रावर तुम्ही जे डेस्टिनेशन वेडिंग कराल ते अगदी तुमच्या बजेट मध्ये असेल. तुमच्या चेहऱ्यावरचा लग्नाचा आनंद कायम टिकावा याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊ.

डेस्टिनेशन वेडिंग सोबतच तुम्ही प्री-वेडिंग फोटोशूट साठी सुद्धा मधुबन कृषी पर्यटन केंद्राची निवड करू शकता.
आपल्या पारंपारिक मराठी आणि शेतकरी संस्कृतीचा अभिमान वाटेल असं डेस्टिनेशन वेडिंग करायला आपल्याला नक्कीच आवडेल अशी अशा आहे.

मधुबन कृषी पर्यटन केंद्र, मिरज, तुम्हाला असेच छान छान आणि अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी तुमची वाट पाहत आहे. बुकिंग साठी येथे क्लिक करा.

#Madhuban_Agro_Tourism #Madhuban_Resort #Agro_Tourism_Near_Me #Agro_Tourism