What is Agro Tourism? कृषी पर्यटन म्हणजे काय?

परवा मंगेश त्याच्या भाच्यासोबत फोनवर गप्पा मारत होता. मंगेश लहानशा गावात राहत होता आणि त्याचा सहा वर्षांचा भाचा मुंबई मध्ये. मंगेशने सहज विचारलं की “तुमच्यात दूध कोण देतं?” यावर मंगेशचा भाचा चिनू उत्तरला “दूधवाला भैय्या”. मंगेशला हसू आवरेना. मंगेश म्हणाला “एवढं लॉकडाऊन संपलं की तू गावाकडे ये राहायला, तुला दाखवतो दूध कोण देतं..”

Agro Tourism

बदलत्या काळानुसार आणि वाढत्या शहरीकरणामुळे आपण ग्रामीण जीवनशैलीपासून दूर दूर जात आहोत हे सत्य आपल्याला नाकारून चालणार नाही. शहरातील नवीन पिढीला ग्रामीण भागाबद्दल, शेती बद्दल बहुतेकवेळा काहीच माहित नसतं. आपण रोज चहा, नाश्ता, जेवण करतो, त्यातले पदार्थ कशापासून बनतात आणि कुठून येतात याबद्दल सुद्धा बहुतांश नवीन पिढी अनभिज्ञच असल्याचं पाहायला मिळतं. भारतासारख्या कृषिप्रधान देशात ग्रामीण आणि शहरी भागात निर्माण होणारी दरी कमी करण्याचं काम कृषी पर्यटनाच्या माध्यमातून सोपे होत आहे.

कृषी पर्यटन म्हणजे नक्की काय? रोजच्या धकाधकीच्या जीवनाला कंटाळलेल्या शहरवासीयांना पुन्हा एकदा प्रफुल्लित करणारा उत्तम पर्याय म्हणजे कृषी पर्यटन. मोकळी आणि शुद्ध हवा, पक्षांचा किलबिलाट, झाडे, प्राणी, शांत आणि प्रसन्न वातावरण, शेतातील पिके, चुलीवर बनवले जाणारे जेवण, खायची आणि राहायची उत्तम सोय, अबालवृद्धांना खेळायला-बागडायला मोकळी जागा, ग्रामीण जीवनशैली, बैलगाडीचा प्रवास, आणि अशा कितीतरी गोष्टी कृषी पर्यटनामध्ये येतात.

शेतीची कामे कशी केली जातात, शेती कशी असते, शेतकऱ्याचे रोजचे जीवन कसे असते, शेतकरी शेतात काय काय कामे करतात, पिके कशी घेतली जातात, शेततळे कसे असते, त्यात मस्त्यपालन कसे करतात, मोत्याची शेती कशी करतात, पॉलीहाऊस कसे असते, दूध देणाऱ्या जनावरांचा गोठा कसा असतो, दूध कसे काढतात अशा अनेक गोष्टी कृषी पर्यटनाच्या निमित्ताने नवीन शहरी पिढीला पाहायला आणि अभ्यासायला मिळतात.

आपल्याला सिमेंटच्या जंगलात बिना चप्पल चालायची सवय नसते, शेतात मात्र ढेकळं तुडवीत चालण्यात अमाप सुख असतं, पाटाच्या वाहणाऱ्या पाण्यात खेळण्यात मजा असते, मोकळ्या आकाशाखाली शेकोटी करून हुरडा पार्टी करण्यातली मौज तर निराळीच, आपल्याला मोबाईलच्या अलार्मने झोपेतून उठायची सवय असते मात्र पक्षांचा किलबिलाट, कोंबड्याची बांग आणि अंगावर येणारी सूर्याची कोवळी किरणे अनुभवत झोपेतून उठण्याचं सुख काही औरच असतं, सायकल, कार, रेल्वे, जहाज, विमान या सगळ्यातून जरी तुम्ही प्रवास केला असेल तरी बैलगाडीच्या प्रवासात जी गंमत असते ती निराळीच. या आणि अशा अनेक गोष्टी शहरवासीयांना अनुभवायला मिळाव्यात यासाठी पर्यटनाचा नवीन पर्याय म्हणून कृषी पर्यटन.

what is agro tourism

असंच एक कृषी पर्यटन केंद्र मिरज पासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर मधुबन कृषी पर्यटन केंद्र या नावाने आहे. तुम्ही येथे एक दिवसाची छोटी पिकनिक काढू शकता, दोन-चार दिवस राहण्याच्या नियोजनाने येऊ शकता. तुमच्या राहण्या, खाण्याची आणि पर्यटनाचा आनंद घेण्याची उत्तम सोय येथे केलेली आहे. ऑनलाईन बुकिंग साठी येथे क्लिक करा. तुम्ही या रस्त्याने प्रवास करत असाल आणि तुम्हाला मुक्कामाची सोय हवीये तरी सुद्धा तुम्ही येथे येऊ शकता, जेणेकरून थोडासा वेळ तरी शेतीच्या सानिध्यात घालवता येईल.

शहरी भागातील प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी कृषी पर्यटन करायला हवे, मातीशी असलेली नाळ टिकवून ठेवायला हवी नाहीतर आपल्या घरातले चिनू सुद्धा “आम्हाला दूध आमचा दूधवाला भैय्या देतो” असं म्हणतील.


#Madhuban_Resort #Madhuban_Agro_Tourism #Agro_Tourism #One_Day_Picnic_Spot