4 Things to do at Agro Tourism

कृषी पर्यटन केंद्राला भेट दिल्यावर या ४ गोष्टी नक्की करा

पर्यटन हा आपल्या सर्वांचाच आवडीचा विषय. वेगवेगळ्या ठिकाणी भेटी द्यायला, वेगवेगळे अनुभव घ्यायला सर्वांनाच आवडतं. भारतासारख्या कृषिप्रधान देशात गेल्या काही वर्षांपासून कृषी पर्यटन हा पर्यटनाचा उत्तम पर्याय म्हणून विकसित होत आहे. कृषी पर्यटन केंद्राला भेट दिल्यानंतर काय काय करायला हवे असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

Agro Tourism near me
या ४ गोष्टी कृषी पर्यटन केंद्रावर जाऊन नक्कीच करायला हव्यात :

१. शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतीची सखोल माहिती घेणे – शेतात जी पिके असतात ती कशी पिकवली जातात, शेती कशी केली जाते, खतं कोणती वापरली जातात, काय काय कष्ट पडतात, पाण्याची सोय कशी होते, शेतीत आधुनिक तंत्रज्ञान काय काय वापरले जाते, पारंपरिक शेती कशी केली जाते इत्यादी अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्ही शेतात प्रत्यक्ष जाऊन जाणून घेऊ शकता. शेतकऱ्यांशी संवाद साधत, शेतातून चालत चालत हे सगळं अनुभवू शकता. आपण रोज जे खातो ते शेतात पिकवण्यासाठी कोणत्या कोणत्या टप्प्यांतून जावं लागतं हे जाणून घेणं आणि अनुभवणं खरंच खूप सुंदर आहे.

२. तिथे चालू असणाऱ्या कामांत भाग घेणे – शेतात विविध कामे चालू असतात. नांगरणे, खुरपणे, कोळपणे, पेरणी, काढणी, राखण करणे इत्यादी इत्यादी. तुम्ही जेव्हा एखाद्या कृषी पर्यटन केंद्राला भेट द्याल, तेव्हा तिथे जी काही कामे चालू असतील ती थोड्या वेळासाठी स्वतः करून बघा, खूप छान अनुभव येईल. समजा तिथे नांगरणी चालू असेल तर नांगर धरायला जमतेय का बघा, शेताला पाणी पाजायचं चालू असेल तर ते तुम्हाला जमतंय का बघा, राखण करायची चालू असेल तर गोफण फिरवून बघा. या अनुभव घ्यायच्या गोष्टी आहेत. ५-१० मिनिटांच्या कामाने सुद्धा तुम्हाला सुंदर अनुभव मिळतील.

३. शहरात न भेटणारे अनुभव घेणे – चुलीवर पिठलं भाकरी करणं किंवा चुलीवर जेवण बनवणं, अंगण सारवणं, विहिरीवर पाणी भरणं, दुभत्या जनावरांना चारा देणं, बुक्कीने कांदा फोडणं, झाडाखाली जेवणं, विहिरीत पोहणं, शेततळ्यातून मासेमारी करणं, अंगणात चांदण्या मोजत झोपणं असे अनुभव शहरात आपल्याला घेता येत नाहीत. पण कृषी पर्यटन केंद्राला भेट दिल्यावर हे अनुभव नक्की घ्या.

Agro Tourism near me

४. अनुभवांचे फोटो सोशल मिडीयावर शेअर करणे – तुम्ही कृषी पर्यटन केंद्रावर जे जे काही कराल ते नक्कीच नवीन असेल, ते अनुभव तुमच्यासाठी नवीन असतील, त्यांना तुमच्या कॅमेऱ्यात कैद करा. त्या फोटोंना सोशल मिडीयावर शेअर करा, तुमचे कृषी पर्यटनाचे अनुभव मित्रमंडळींना सांगा. त्यांना सुद्धा असे सुंदर अनुभव घेण्यास आणि कृषी पर्यटन करण्यास प्रोत्साहित करा.

एक लक्षात घ्या, बाकी मजा करायला तुम्ही इतर कुठेही जाऊ शकता, पण हे सुंदर सुंदर अनुभव घेण्यासाठी कृषी पर्यटन नक्की करा. एक दोन दिवस शेतकरी बनून राहा, ते आयुष्य जगून अनुभवा, एक वेगळंच मानसिक समाधान तुम्हाला मिळेल. 

मधुबन कृषी पर्यटन केंद्र, मिरज, तुम्हाला असेच छान छान आणि अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी तुमची वाट पाहत आहे. बुकिंग साठी येथे क्लिक करा.

#Madhuban_Agro_Tourism #Madhuban_Resort #Agro_Tourism_Near_Me